मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इच्छा...

इच्छा....  न संपणारी स्वप्नाची एखादी सुंदर माळ असावी न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी तुझ्यासारखी माणसे असावी आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा एक छोटे जग प्रत्येकाजवळ असावे जगाच्या या गर्दीमध्ये कुणीही एकटे नसावे दाटलेल्या या नभास कधीही बरसता न यावे का असे हे भोग माझ्या नशिबी यावे भिजून पावसात सारे जग पाहिले पण... माझ्या शिंपल्यात दोन थेंबही न यावे -नम्रता

मनात नसतांना....

मनात नसतांना....   मनात नसतांना कुणाला कधी कधी दुःखवावे लागते उत्तर माहीत नसलेल्या प्रश्नांना कधी कधी सामोरे जावे लागते   मनात नसतांना कुणाला   कधी कधी फसवावे लागते   वाट माहीत नसतांना वाटसरूला   वाटेने त्या जावेच लागते फांदीच्या मनात नसतांना  फुलाला डहाळीवरून पडावे लागते अग्नीच्या मनात नसतांना शवाला कधी कधी जाळावे लागते माणसाच्या मनात नसतांना कधीतरी जगातून जावेच लागते अन..... आपल्या मनात नसतांना आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीला सोडून जावेच लागते. -नम्रता

प्रश्न

   चेहऱ्यावरच्या हास्याने मनातले दुःख लपेल का? मनात चाललेला गोंधळ जवळच्यालाही उमगेल का? इतकं सोप असतं का आयुष्य जितकं सरळ आपल्याला दिसत की असतं पुरात वाहून गेलेल्या वाळूसारखं? येईल का परत तेच हास्य सुटेल का तोही गुंता , गुंते मधला विरह, विरहातील घालमेल न घालमेल मधून येणारे अश्रू? अश्रूला फुटेल का बांध?  मनाला सुटेल का पाझर? पाझरमधील तो गंध वाटेल का हवा हवासा? -नम्रता

मन......

अपुर्ण

                                                          असाही एक दिवस उगवेल असं कधी वाटलंच  नाही, मी माझं माझं करत राहिली अन माझं कधी निसटून गेलं समजलंच नाही...     अचानक मला काल रात्री कॉल आला आणि तो म्हणाला मला कोणत्याही परिस्थितीत मध्ये दोन महिन्याच्या आत लग्न करायचंय.! मला समजेच ना की, हा अचानक असा का बोलतोय..? मला वाटलं नेहमीसरखी आजही प्रेमाने चेष्टा करत असेल. मी दुर्लक्ष करत विषय सोडून दिला.   आज पहिला पेपर असल्याने सकाळी उठून, पटापट आवरून पेपरला गेले, पेपर सुटल्यावर मोबाइल बघितला तर त्याचे 6 मिस कॉल होते , मी घाबरले कि असं काय झाल कि एकदम 6- 6 मिस कॉल्स? कॉलबॅक केला तर लगेच उचलला फोन त्याने आणि तो परत तेच बोलला कि, मला तुझ्यासोबत दोन माहिन्यात लग्न करायचं.! आता मात्र मला त्याच्या आवाजात गांभीर्य जाणवलं, मी थोडी खोलात जाऊन विचारलं नेमकं काय झालंय? तू असं लग्न करायचं आणि तेही दोन महिन्यात हे , एकदम मना...

कोविड -19

कोविड -19       सर्वप्रथम कोविड -19 ला सामना करणाऱ्या प्रत्येकालाच सलाम.  तसेच यामध्ये डॉक्टर्स, नर्स, वार्ड बॉय, पोलीस, सफाई कामगार, सरकार, या सर्वांचे परिवार आणि विशेष म्हणजे नागरिक यांच्या सहकार्याविना काहीही शक्य नाही. कोविड-19 या लढाईत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.     घराच्या बाहेर संपूर्ण जग कोविड-19 सोबत युद्धपातळीवर लढा करत आहे परंतु हे झाले घराच्या बाहेरचे. याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला  वेळोवेळी मीडिया सोशलमीडियाच्या माध्यमातून प्राप्त होते हे विशेष सांगायची बाब नाही.      यासोबतच घरातही एक वेगळेच युद्ध सुरू आहे आणि हे प्रत्येकाच्याच घरात आहे असं वाटते. 21 मार्च;  बाहेर लढाई सुरू असतांना घरात वेगेवळे बेत आखण्यात आले. असे वाटले एका दिवसाने होईल पण लगेचच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन ची घोषणा झाली. हळूहळू याचेही नियोजन झाले. वेगवेगळी पक्वान्ने, खाद्य घरात बनत गेले, घरातली वेगवेगळी कामे काढण्यात आली, आईची धावपळ वेगळी, बाबांची कामे वेगळी आणि पाल्यांची मात्र नवीन कसरत. यामध्य...