मुख्य सामग्रीवर वगळा

प्रश्न



   चेहऱ्यावरच्या हास्याने
मनातले दुःख लपेल का?
मनात चाललेला गोंधळ
जवळच्यालाही उमगेल का?

इतकं सोप असतं का आयुष्य
जितकं सरळ आपल्याला दिसत
की असतं पुरात वाहून
गेलेल्या वाळूसारखं?

येईल का परत तेच हास्य
सुटेल का तोही गुंता , गुंते
मधला
विरह, विरहातील घालमेल
न घालमेल मधून येणारे अश्रू?

अश्रूला फुटेल का बांध?
 मनाला सुटेल का पाझर?
पाझरमधील तो गंध
वाटेल का हवा हवासा?
-नम्रता

टिप्पण्या

  1. तुझ्या नावाप्रमाणे एकदम नम्रपणे तू विचारले प्रश्न खरच खूप काही सांगून जाते.
    खूप छान कविता....... 👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. प्रश्नांमध्ये कितीतरी उत्तरं दडलेली

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मन......

इच्छा...

इच्छा....  न संपणारी स्वप्नाची एखादी सुंदर माळ असावी न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी तुझ्यासारखी माणसे असावी आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा एक छोटे जग प्रत्येकाजवळ असावे जगाच्या या गर्दीमध्ये कुणीही एकटे नसावे दाटलेल्या या नभास कधीही बरसता न यावे का असे हे भोग माझ्या नशिबी यावे भिजून पावसात सारे जग पाहिले पण... माझ्या शिंपल्यात दोन थेंबही न यावे -नम्रता