मुख्य सामग्रीवर वगळा

अपुर्ण


                             
                     
      असाही एक दिवस उगवेल असं कधी वाटलंच  नाही, मी माझं माझं करत राहिली अन माझं कधी निसटून गेलं समजलंच नाही...

    अचानक मला काल रात्री कॉल आला आणि तो म्हणाला मला कोणत्याही परिस्थितीत मध्ये दोन महिन्याच्या आत लग्न करायचंय.! मला समजेच ना की, हा अचानक असा का बोलतोय..? मला वाटलं नेहमीसरखी आजही प्रेमाने चेष्टा करत असेल. मी दुर्लक्ष करत विषय सोडून दिला.
 



आज पहिला पेपर असल्याने सकाळी उठून, पटापट आवरून पेपरला गेले, पेपर सुटल्यावर मोबाइल बघितला तर त्याचे 6 मिस कॉल होते , मी घाबरले कि असं काय झाल कि एकदम 6- 6 मिस कॉल्स?
कॉलबॅक केला तर लगेच उचलला फोन त्याने आणि तो परत तेच बोलला कि, मला तुझ्यासोबत दोन माहिन्यात लग्न करायचं.! आता मात्र मला त्याच्या आवाजात गांभीर्य जाणवलं, मी थोडी खोलात जाऊन विचारलं नेमकं काय झालंय? तू असं लग्न करायचं आणि तेही दोन महिन्यात हे , एकदम मनावर का घेतलय..? तर तो अचानक रडायला लागला. कधीही स्वतः न रडता दुसऱ्यांना राडवणारा हा, आज एकदम हळव्या मनाने रडत होता, इतका की त्याला रडू आवरत च नव्हतं. मी मात्र गूढ मनाने विचार करत बसली के असं काय झालं

            तो खूप खूप रडला आणि हुंदके देत देत मला बोलला माझं चुकल मला क्षमा कर तू आयुष्यात असतांनाही माझ्या आयुष्यात मागच्या तीन वर्षांपासून एक मुलगी होती, आधी ती फक्त आणि फक्त माझी मैत्रीण होती, पण कालानुरूप मी तिच्यात कसा गुंतत गेलो माझं मलाच समजलंच नाही... हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली, पन त्याच्या आवाजातला बदल पाहून मी स्वतःला चटकन सावरतं घेतलं आणि पुढे ऐकायला लागले... तो म्हणाला,  आज मात्र ती मला सोडून गेली, मला माफ कर, पण मला समजून घे गं,  मी मुद्दाम नाही केलं हे सर्व.! तूच समजून घेऊ शकते मला,  मान्य आहे मी वाईट वागलो तुझ्यासोबत,  पण मला माफ कर , ती तर गेली सोडून,  तूच सांभाळ मला नाहीतर मी कायमचा संपून जाईल... असं बरंच काही...
मी निशब्द झाले होते,  काही समजेच ना की  यावर काय प्रतिउत्तर द्यावे... आम्ही तासंतास बोलायचो ग... सर्व एकमेकांना सांगायचो, मनाने मी पूर्णपणे तिचा झालेलो..। पण दिवाळीपासून काय झालं समजलंच नाही, आणि एकेदिवशी सर्व संपवून अचानक सोडून गेली ग ती...



         त्याच्या या बोलण्यामध्ये, माझा कुठेचं विचार नव्हता, एरवी मला खूप त्रास व्हायचा या असल्या गोष्टींचा, प्रेमात धोका वगैरे या गोष्टी मी सहन करूच शकत नव्हते, पण आज मात्र असं काहीच वाटलं नाही, म्हणजे मी चिडले देखील नाही... का माहित नाही...
एक ना हजार प्रश्न पडले मला , या सर्वात माझा काय दोष..? यात माझ्या मनाचा कुठे विचार करण्यात आला..? मी केलेली तडजोड कुठे गेली..? मी याला सुखदुःखात दिली साथ तो अचानक कसा विसरला..? मुळात आधीपासून मी असतांना तो गेलाच कसा दुसरीकडे ? याच्या अश्या वागण्यामध्ये माझंच काही चुकलं असेल का..? मी कुठे कमी पडले का..? नेमकी चूक कुणाची?
इतकं हलकं असत का प्रेम..? अशी असते प्रेमाची परिभाषा.? आपण एखाद्यावर निःस्वार्थ पणे प्रेम कराव आणि त्याने मात्र आपल्या प्रेमाचा खेळ करावा, आणि जेव्हा त्याच्यासोबत असा काही घडून येईल तेव्हा त्याने आपल्याजवळ पश्चाताप करत यावं... इतकं स्वस्त असत प्रेम कि कुणावरही व्हावं...?
 

   
                           नम्रता अनंत कडव

टिप्पण्या

  1. मॅडम तुम्ही तुमच्या लेखातून असंख्य तरुण तरुणीच्या जीवनात घडलेल्या घटना चे हुबेहुब वर्णन करून त्यांच्या कोंबलेले भावनाना कोणीतरी लेखनातून स्पष्ट केल्या याची जाणीव होते. नक्कीच या लेखाने असंख्य तरुण - तरुणी दिलासा मिळेल. एकदम अप्रतिम लेखन.

    उत्तर द्याहटवा
  2. Wa,bahut khub,tuzya ya lekhatun,vastav spasht hote ki baryach taruni tyani nivdlelya sathidaravr nisearthi Prem krtat matra to ya nisearthi premala tyala jevha ekhadi addl ghadte tevhach janun gheto.ya lekhatun tu ajchya taruninna savadh krnyasathi khup motha,upyukt salla Dila,apratim ,yogya udaharn bahut badhiya , Khup mast

    उत्तर द्याहटवा
  3. प्रत्येक युवा पिढी नी हा लेख वाचन्यासारखाआहे

    उत्तर द्याहटवा
  4. प्रत्येकाच्या मनातलं लीहणारा खरा लेखक असतो....🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या कल्पनेतील गाव

  माझ्या कल्पनेतील गाव असावं गावसारखं  सकाळी पाखरांचा किलबिलाट ऐकवणार जनावरांच्या गळ्यातील घुंगराच्या रुणझुण आवाजत रमणार सकाळच्या शेण्याच्या सड्याने सारवलेल्या अंगणात संस्कृती जपण्यासाठी काढलेल्या रांगोळीच झुळणाऱ्या पानांचं, फुलणारऱ्या फुलांचं पेलणाऱ्या हातांच दुसऱ्यासाठी हळाळणाऱ्या मनाचं शेजारच्यांच्या दुःखाने आपल्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या माणसांच माणुसकी जपणाऱ्या मनाचं आपुलकीने जवळ घेणाऱ्या हाताच नसावं नुसत्या बातांच आणि पोकळ मनाचं अस समृद्ध गाव असावं माझ.

ती.....

 ती.. घरात एकटं असल्यावर तुझ्यासोबत जगता येत... थोडं हसून झाल्यावर मनसोक्त रडता येत.. आपल्या रोजच्या भेटी तशा नवीनच असायच्या  ... क्षणभर भेटलो तरीही हृदय जाळीत बसायच्या... कधी कधी आपली भेट तेव्हढ्यापुरतीच असायची तेव्हा थोडस रुसूनही तू गोड हसायची.... तुझ्या प्रेमाची विशालता बोलते अबोल गाणी तुझ्या विरहाची वेदना आणते डोळ्यात पाणी....                       नम्रता अनंत कडव