मुख्य सामग्रीवर वगळा

इच्छा...

इच्छा....

 न संपणारी स्वप्नाची एखादी
सुंदर माळ असावी
न बोलता ऐकू येईल
अशी शब्दांची ओळ असावी

ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी
आणि न मागताही साथ देणारी
तुझ्यासारखी माणसे असावी

आकाशात एक तारा आपला असावा
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा
एक छोटे जग प्रत्येकाजवळ असावे
जगाच्या या गर्दीमध्ये कुणीही एकटे नसावे

दाटलेल्या या नभास
कधीही बरसता न यावे
का असे हे भोग माझ्या नशिबी यावे

भिजून पावसात सारे
जग पाहिले पण...
माझ्या शिंपल्यात
दोन थेंबही न यावे

-नम्रता

टिप्पण्या

  1. खूप अप्रतिम कविता.... एकदम मनाला भिडणारी..... हृदयस्पर्शी....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रश्न

   चेहऱ्यावरच्या हास्याने मनातले दुःख लपेल का? मनात चाललेला गोंधळ जवळच्यालाही उमगेल का? इतकं सोप असतं का आयुष्य जितकं सरळ आपल्याला दिसत की असतं पुरात वाहून गेलेल्या वाळूसारखं? येईल का परत तेच हास्य सुटेल का तोही गुंता , गुंते मधला विरह, विरहातील घालमेल न घालमेल मधून येणारे अश्रू? अश्रूला फुटेल का बांध?  मनाला सुटेल का पाझर? पाझरमधील तो गंध वाटेल का हवा हवासा? -नम्रता

मन......

ती.....

 ती.. घरात एकटं असल्यावर तुझ्यासोबत जगता येत... थोडं हसून झाल्यावर मनसोक्त रडता येत.. आपल्या रोजच्या भेटी तशा नवीनच असायच्या  ... क्षणभर भेटलो तरीही हृदय जाळीत बसायच्या... कधी कधी आपली भेट तेव्हढ्यापुरतीच असायची तेव्हा थोडस रुसूनही तू गोड हसायची.... तुझ्या प्रेमाची विशालता बोलते अबोल गाणी तुझ्या विरहाची वेदना आणते डोळ्यात पाणी....                       नम्रता अनंत कडव