मुख्य सामग्रीवर वगळा

मन......

मन.....

      मन हे अस असतं
आजवर मला काधी कळले नाही
अन माझी चूक मला कधी उमगली नाही

वारंवार भांडूनही
पहाट ही आपली हसत होते 

मग आजच का असे झाले मला कळले नाही

माझा राग, माझं भांडण
हे फक्त निमित्त असतं
तुझ्या माझ्या बोलण्यातील वेळ वाढवण्याचं कारण असतं
तस तर आपलं बोलणं दोन मिनिटातच संपत

आज वाटतय ते दोन मिनिट बोलणे
हे केवळ एक शहाणपण होतं
तुझ्या आणि माझ्यातील
हेच एक वेगळेपण होतं

व्यस्त आहे हे सांगून टाळायचा
तरीही व्यस्त आहे हे सांगायला
जो वेळ तू मला द्यायचा
त्यातच मी आनंदी होते

पण त्या आनंदात विश्वासघात होता
हे आज उमगलय
हे जग ही दुनिया विश्वासघाती आहे
असे नाही....

आपल्या जवळचे लोक असे आहेत
हे मला आता उमगलय
अनेकदा तू गप्प राहूनही
खुप काही सांगून जातोस
आठवणींच्या वाळवंटात
मला एकटं सोडून जातोस
नम्रता....

टिप्पण्या

  1. खूप छान मॅडम, शेवटी मनानी केली चूक मनाला चा सावरा लागते. हे तुम्ही तुमच्या कवितेच्या माध्यमातून जण माणसा पर्यंत पोहोचवली.
    कविता खूप छान आहे...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रश्न

   चेहऱ्यावरच्या हास्याने मनातले दुःख लपेल का? मनात चाललेला गोंधळ जवळच्यालाही उमगेल का? इतकं सोप असतं का आयुष्य जितकं सरळ आपल्याला दिसत की असतं पुरात वाहून गेलेल्या वाळूसारखं? येईल का परत तेच हास्य सुटेल का तोही गुंता , गुंते मधला विरह, विरहातील घालमेल न घालमेल मधून येणारे अश्रू? अश्रूला फुटेल का बांध?  मनाला सुटेल का पाझर? पाझरमधील तो गंध वाटेल का हवा हवासा? -नम्रता

इच्छा...

इच्छा....  न संपणारी स्वप्नाची एखादी सुंदर माळ असावी न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी तुझ्यासारखी माणसे असावी आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा एक छोटे जग प्रत्येकाजवळ असावे जगाच्या या गर्दीमध्ये कुणीही एकटे नसावे दाटलेल्या या नभास कधीही बरसता न यावे का असे हे भोग माझ्या नशिबी यावे भिजून पावसात सारे जग पाहिले पण... माझ्या शिंपल्यात दोन थेंबही न यावे -नम्रता