कोविड -19
सर्वप्रथम कोविड -19 ला सामना करणाऱ्या प्रत्येकालाच सलाम. तसेच यामध्ये डॉक्टर्स, नर्स, वार्ड बॉय, पोलीस, सफाई कामगार, सरकार, या सर्वांचे परिवार आणि विशेष म्हणजे नागरिक यांच्या सहकार्याविना काहीही शक्य नाही. कोविड-19 या लढाईत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.
घराच्या बाहेर संपूर्ण जग कोविड-19 सोबत युद्धपातळीवर लढा करत आहे परंतु हे झाले घराच्या बाहेरचे. याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला वेळोवेळी मीडिया सोशलमीडियाच्या माध्यमातून प्राप्त होते हे विशेष सांगायची बाब नाही.
यासोबतच घरातही एक वेगळेच युद्ध सुरू आहे आणि हे प्रत्येकाच्याच घरात आहे असं वाटते. 21 मार्च; बाहेर लढाई सुरू असतांना घरात वेगेवळे बेत आखण्यात आले. असे वाटले एका दिवसाने होईल पण लगेचच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन ची घोषणा झाली. हळूहळू याचेही नियोजन झाले. वेगवेगळी पक्वान्ने, खाद्य घरात बनत गेले, घरातली वेगवेगळी कामे काढण्यात आली, आईची धावपळ वेगळी, बाबांची कामे वेगळी आणि पाल्यांची मात्र नवीन कसरत. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांनी आपले कलागुण, छंद, ज्याकडे कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष झाले होते किंवा वेळेअभावी ते जोपासता आले नाहीत त्यांनी ते बाहेर काढून त्यावर काम चालू केलं. अश्याप्रकारे प्रत्येकच व्यक्ती यामध्ये हळूहळू रमू लागले, आणि अस असतांना पुढील घोषणा झाली लॉकडाऊन 3 मे पर्यंत ची, आणि सर्वांची हवा निघाली, यानंतर सर्वांच्या लक्षात आले आता हे लवकर संपणारे नव्हे.
आता या लढाईत खरी गंमत सुरू झाली. घरातील किचपट, कित्येक पालक वर्गाचे पारंपरिक विचार आणि आजच्या पिढीचे आधुनिक विचार यामधून बरेचसे वादात्मक, चर्चात्मक गोष्टीला उधाण आलं होतत्यातून वेगळा कलह निर्माण झाला. यावेळी जे आधीपासूनच हे दोन्ही विचार स्वीकारून पुढे जात आहेत कदाचित त्यांचे घर याला अपवाद ठरतील. कोविड-19 मुळे चुका करायला भरपूर संधी मिळलेल्या आहे. बहुतेक लोकांना कामाच्या व्याप, सुट्ट्यांच्या कमतरता, अश्या एक ना अनेक कारणांमुळे घरातील सदस्यांना वेळ देता येत नव्हता. पण आता कोविड-19 मुळे जवळपास सर्वजण घरी असल्यामुळे घरातील परिवारातील सदस्यांची नव्याने ओळख झाली. घरातील आजी- आजोबा, भावंडे आणि विशेषतः आई- वडिल त्यांच्या नात्याचे यातील जवळीक तर आपण बघतोच आहे. पण आता यांच्याकडून यांच्या अनुभवातून खूप काही शिकता येते याची प्रचितीही आता येते आहे. यांचे अनुभव आणि आपलं व्यावहारिक जीवन हे दोन्ही भिन्न असलं तरीही यातून माध्यमार्ग निघू शकतो हे समजायला लागलं. सद्याच्या परिस्थिती नवरा-बायकोच्या शुल्लक वादावरून खूप काही घडतंय, यातूनही माध्यमार्ग निघू शकतो हे कोविड-19 ने शिकवलंय. हे झाले परिवाराचे.
निसर्गदेखील बघा. कोविड-19 ने निसर्गालाही नवीन संधी दिली आहे. आपली झालेली हानी दुरुस्त करण्यास मानव असमर्थ ठरणार म्हणून निसर्गानेही स्वतःचे स्वतःच शुद्धीकरण करून घेण्याचे ठरवलेले दिसते. कदाचित त्यामुळेच स्वछंदपणे वावरणारे पक्षी त्यांचे विविध आवाज, जे इतक्यात ऐकूच येत नव्हते ते आता लॉकडाऊन च्या काळात अनुभवायला मिळत आहे. शुद्ध हवा, पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचे स्वछंदपणे वावरणे हे लोभनिय आहे. कारण मूलतः लोभस वृत्ती असलेला मानव आज कोविड-19 मुळे पिंजऱ्यात आणि पिंजऱ्यातील पक्षी, प्राणी यामुळे मुक्तपणे संचार करत आहे.
कोविड -19 मुळे पालकांमध्ये एक नवीन बदल आपणास दिसेल तो म्हणजे बाहेर जगात स्पर्धा ही तुफान वेगाने वाढत आहे आणि ही राहणार अश्या या स्पर्धेच्या युगात स्पर्धा ही विद्यार्थ्यांमध्ये राहिलेलीच नाही ती पालकांची झालेली होती परंतु या वर्षी परीक्षाच झालेली नाही त्यामुळे शाळकरी मुलेही आनंदात आहेत. आयुष्यात बदल हवा असतो आणि तो स्वीकारावा लागतो. जो स्वीकारून पुढे चालतो तोच या जगाचा पूर्णपणे स्वीकार करू शकतो.
कोविड -19 आणि त्यामुळे आलेल्या लॉकडाऊन आणि त्यामुळे आलेले Work from Home यातूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत. यांनी आपल्याला एक संधी दिली आहे, स्वतःला परत एकदा सिध्द करण्याची. घरी राहूनही सेवार्थ काम करण्याची, आपल्यातील कौशल्य, छंद जोपासून जगासमोर आणण्याची. घराबाहेर जाता येत नसल्याने घरात उपलब्द असलेल्या साहित्य साठ्यांमध्ये घर चालत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे बंद असल्याने घरच्या घरीच सर्व पदार्थ बनवून त्याचा आस्वाद आपण घेत आहोत. यामुळे सर्वांची प्रकृतीही सुधारत आहे. एका अर्थाने लॉकडाऊन चे फायदे ही आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे अश्या संकटाच्या प्रसंगी सुद्धा आपण सकारात्मक विचार करत याचा फायदा घ्यावा असे वाटते. हे सर्व करताना मात्र आत्ताच नाही तर आधीपासूनच Work From Home करणाऱ्या आपल्या आई ला मात्र अधिकच त्रास व्हायला नको याची काळजी आपण घ्यायला हवी. त्यामुळे घरी रहा, सुरक्षित रहा, धैर्य ठेवा ही परीस्थित सुद्दा जाईल, असा सकारात्मक विचार ठेवूया आणि घराच्या आणि बाहेरच्या ही शासनाला सहकार्य करूया, भारत माता की जय.
- नम्रता कडव
घराच्या बाहेर संपूर्ण जग कोविड-19 सोबत युद्धपातळीवर लढा करत आहे परंतु हे झाले घराच्या बाहेरचे. याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला वेळोवेळी मीडिया सोशलमीडियाच्या माध्यमातून प्राप्त होते हे विशेष सांगायची बाब नाही.
यासोबतच घरातही एक वेगळेच युद्ध सुरू आहे आणि हे प्रत्येकाच्याच घरात आहे असं वाटते. 21 मार्च; बाहेर लढाई सुरू असतांना घरात वेगेवळे बेत आखण्यात आले. असे वाटले एका दिवसाने होईल पण लगेचच 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन ची घोषणा झाली. हळूहळू याचेही नियोजन झाले. वेगवेगळी पक्वान्ने, खाद्य घरात बनत गेले, घरातली वेगवेगळी कामे काढण्यात आली, आईची धावपळ वेगळी, बाबांची कामे वेगळी आणि पाल्यांची मात्र नवीन कसरत. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांनी आपले कलागुण, छंद, ज्याकडे कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष झाले होते किंवा वेळेअभावी ते जोपासता आले नाहीत त्यांनी ते बाहेर काढून त्यावर काम चालू केलं. अश्याप्रकारे प्रत्येकच व्यक्ती यामध्ये हळूहळू रमू लागले, आणि अस असतांना पुढील घोषणा झाली लॉकडाऊन 3 मे पर्यंत ची, आणि सर्वांची हवा निघाली, यानंतर सर्वांच्या लक्षात आले आता हे लवकर संपणारे नव्हे.
आता या लढाईत खरी गंमत सुरू झाली. घरातील किचपट, कित्येक पालक वर्गाचे पारंपरिक विचार आणि आजच्या पिढीचे आधुनिक विचार यामधून बरेचसे वादात्मक, चर्चात्मक गोष्टीला उधाण आलं होतत्यातून वेगळा कलह निर्माण झाला. यावेळी जे आधीपासूनच हे दोन्ही विचार स्वीकारून पुढे जात आहेत कदाचित त्यांचे घर याला अपवाद ठरतील. कोविड-19 मुळे चुका करायला भरपूर संधी मिळलेल्या आहे. बहुतेक लोकांना कामाच्या व्याप, सुट्ट्यांच्या कमतरता, अश्या एक ना अनेक कारणांमुळे घरातील सदस्यांना वेळ देता येत नव्हता. पण आता कोविड-19 मुळे जवळपास सर्वजण घरी असल्यामुळे घरातील परिवारातील सदस्यांची नव्याने ओळख झाली. घरातील आजी- आजोबा, भावंडे आणि विशेषतः आई- वडिल त्यांच्या नात्याचे यातील जवळीक तर आपण बघतोच आहे. पण आता यांच्याकडून यांच्या अनुभवातून खूप काही शिकता येते याची प्रचितीही आता येते आहे. यांचे अनुभव आणि आपलं व्यावहारिक जीवन हे दोन्ही भिन्न असलं तरीही यातून माध्यमार्ग निघू शकतो हे समजायला लागलं. सद्याच्या परिस्थिती नवरा-बायकोच्या शुल्लक वादावरून खूप काही घडतंय, यातूनही माध्यमार्ग निघू शकतो हे कोविड-19 ने शिकवलंय. हे झाले परिवाराचे.
कोविड -19 मुळे पालकांमध्ये एक नवीन बदल आपणास दिसेल तो म्हणजे बाहेर जगात स्पर्धा ही तुफान वेगाने वाढत आहे आणि ही राहणार अश्या या स्पर्धेच्या युगात स्पर्धा ही विद्यार्थ्यांमध्ये राहिलेलीच नाही ती पालकांची झालेली होती परंतु या वर्षी परीक्षाच झालेली नाही त्यामुळे शाळकरी मुलेही आनंदात आहेत. आयुष्यात बदल हवा असतो आणि तो स्वीकारावा लागतो. जो स्वीकारून पुढे चालतो तोच या जगाचा पूर्णपणे स्वीकार करू शकतो.
- नम्रता कडव
अतिशय महत्त्व पुर्ण माहिती आणि स्वतः ला बंदिस्त समजणार्या असंख्य लोकांना एक चांगला उपदेश देवून, शासनाला नागरिकांनी सहकार्य केले पाहीजे तुम्ही खूप सोप्या शब्दात पटवून सांगितले. तुमचे लेखन एकदम अप्रतिम आहे. समाजात जागृती करण हे लेखकाचे काम आहे ते तुम्ही सिद्ध केल. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत...
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाThank you
हटवाGood job dear,,,, keep it up, God bless you
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाApratim ,ya sanktachya Kalat sakartmakta urja denare,utkrusht,surekh,ashavadi drusthrikon debate,wa bahut badhiya ,asech lihitat raha
उत्तर द्याहटवाThank you
हटवा