मनात नसतांना....
मनात नसतांना कुणाला
कधी कधी दुःखवावे लागते
उत्तर माहीत नसलेल्या प्रश्नांना
कधी कधी सामोरे जावे लागते
मनात नसतांना कुणाला
कधी कधी फसवावे लागते
वाट माहीत नसतांना वाटसरूला
वाटेने त्या जावेच लागते
फांदीच्या मनात नसतांना फुलाला डहाळीवरून पडावे लागते
अग्नीच्या मनात नसतांना शवाला
कधी कधी जाळावे लागते
माणसाच्या मनात नसतांना
कधीतरी जगातून जावेच लागते
अन.....
आपल्या मनात नसतांना
आपल्याला आपल्या प्रिय
व्यक्तीला सोडून जावेच लागते.
मनात नसतांना कुणाला
कधी कधी दुःखवावे लागते
उत्तर माहीत नसलेल्या प्रश्नांना
कधी कधी सामोरे जावे लागते
मनात नसतांना कुणाला
वाट माहीत नसतांना वाटसरूला
वाटेने त्या जावेच लागते
फांदीच्या मनात नसतांना फुलाला डहाळीवरून पडावे लागते
अग्नीच्या मनात नसतांना शवाला
कधी कधी जाळावे लागते
माणसाच्या मनात नसतांना
कधीतरी जगातून जावेच लागते
अन.....
आपल्या मनात नसतांना
आपल्याला आपल्या प्रिय
व्यक्तीला सोडून जावेच लागते.
-नम्रता
बरोबर आहे, पण प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही, कधी कधी आपणही जबाबदार असतो,,,,,,,,,,,,, पण छान आहे कविता 👌💖👍
उत्तर द्याहटवाबरोबर आहे पण जबाबदार कुना एकाला नाही ठरवू शकत ना.
हटवानमा ताई...👍🏻👍🏻🤗👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा