मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मैत्री हक्काची असते तेव्हा.....

     मैत्री हक्काची असते तेव्हा आपण किती मनमोकळेपणाने बोलतो ना. अगदी सर्वच. बिनधास्त, पुढे काय होणार याचा जराही विचार करत नाही. खळखळत्या पाण्यासारखी पुढे-पुढे-पुढे सरकत जाते ती मैत्री.       काही गोष्टी पटतात काही नाही. पण शांत समंजस्याने राहून बघाव राहता येत. प्रत्येकचवेळी शांत राहिल्यावर एकदा कधीतरी बान सुटतोच नाही का ? पण तेव्हा खरी गरज ही मैत्री ओळखण्याची असते. प्रत्येकवेळी शांत राहणारी, शांत समजस्यांनी वागणारी राहणारी जर एखादेवेळी अचानक चिडली तर अशावेळी काय प्रतिक्रिया असावी ?            क्षणभर राग साहजिकच आहे. पण......पण अंतर्मनात खोलात जाऊन विचार केला. मुळाशी गेलो तर उत्तर नक्की सापडत. अशावेळी अबोला धरणे  खरच योग्य आहे का ?             आपण जेव्हा आपल्या माणसांवर कळत नकळतपणे रागावतो ,भांडतो,माफी मागतो पुन्हा जवळ येतो. ज्या व्यक्तीवर आपण हक्क दाखवतो ती व्यक्ती आपल्याला आपल्या जिवापेक्षाही प्रिय असते.      ...
अलीकडील पोस्ट

स्वतः

  निस्वार्थीपणे जगत आले आहे पण इतरांनी अर्थ मात्र सोईनुसार लावले खोटे वागणे कधी नाही जमले खोटे खोटे चांगले म्हणावे तरी कसे स्वतःच्या आनंदासाठी कुणालाही कधीच फसवले नाही अन ते कधी जमनारही नाही चुकांवर पांघरून कधी देता आले नाही इतरांना दुःखून आनंदी कधीच झाले नाही स्वतःचा खरेपणा इतरांच्या वागण्याला टीचवत गेला खरेपणातूनच शहाणपणा असा शिक्का मिळाला या सर्वांमुळे जर कुणी म्हणत असेल मला की मला माणस जपता येत नाही तर याचा सार्थ अभिमान आहे माला. नम्रता मंदा अनंत

असा एक क्षण येतो......

         किती वेगळ आहे ,जे आवडत,बघितलेलं असत , त्याचा विचारही होत नाही आणि ज्याला कधी पाहिलेलं नसत,काही  माहिती नसत कुणीतरी तिसरी व्यक्ती येऊन सांगते त्यावर विश्वासही बसतो. त्यांच्या सांगण्यावरून वारंवार दाखवायलाही आपले  नातेवाईक, घरचे  तयार होतात.         आपण आयुष्यात कितीही चांगल वागलं ना तरीही काही ना काही राहूनच जात. आपलं वागणं, बोलण, प्रत्येकवेळी सारख असेलच अस नाही ना.      आपली होणारी चिडचिड ही रास्त असते. पण ती समजून घेता आलं असत तर किती बर झालं असत . अस म्हणतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही कायम हसत रहायच. आपले गराने कुणालाही सांगायचे नाही.कमाल आहे ना ,प्रत्येकवेळी नाही हो पुस्तकातल्या शब्दसारखं जगता येत.        वाटत कुणाजवळ तरी बोलावं ,हक्काचे. प्रत्येकच बाब सांगावी . नेहमीच चांगल्या गोष्टी का शेअर कराव्यातना कधी कधी मनातली प्रत्येकच गोष्ट बोलावी. मी म्हणते बोलावीच याने मन हलक होत की नाही माहीत नाही पण यामुळे नवीन चांगल्या गोष्टींचा विचार मन करायला ल...

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा क्षणभर मिटून डोळे स्वप्न व्हावे पुन्हा एकदा हरवलेल्या वाटांना शोधीत जावे पुन्हा एकदा श्वासात गाणे गुंफीत जावे पुन्हा एकदा आभाळ ओले  मिठीत घ्यावे पुन्हा एकदा तुटलेल्या धाग्यांना  जोडीत जावे  पुन्हा एकदा सुकलेल्या फांदीला  बहर यावे पुन्हा एकदा मनाने एकमेकांच्या सोबत राहावे पुन्हा एकदा....... नम्रता अनंत कडव

भावना

ही कविता आहे  इतकाच भाव मनात ठेव माझ्यात आता ताकत नाही कुणाला दुखवायची हे ध्यानात ठेव समज गैरसमज नको परत काहीच माझं प्रेम तुझं प्रेम माझ्या भावना तुझं दुःख रुसवे फुगवे नाही आता परवडणारे खूप घालमेल झाली जीव कासावीस होऊन गेला काय सांगू सख्या तुला माझा जीव माझ्यातच नाही राहिला परत तुझ्याशी बोलणं नव्याने गोष्ट सुरू करणे आता नाही जमायचे हे घाव मनावरचे आता नाही परवडायचे दुखलं असेल तुझही मन कितीदा सावरायचे तुझ्या या वागण्यातले अदलाबदल आता नाही जमायचे किती सावरू तुला अन मलाही नाही घेणार कुणी समजून प्रेम वेदना तुझ्या आणि माझ्या आता दोघांनीच जगाशी लढायचे नम्रता अनंत कडव

माझ्या कल्पनेतील गाव

  माझ्या कल्पनेतील गाव असावं गावसारखं  सकाळी पाखरांचा किलबिलाट ऐकवणार जनावरांच्या गळ्यातील घुंगराच्या रुणझुण आवाजत रमणार सकाळच्या शेण्याच्या सड्याने सारवलेल्या अंगणात संस्कृती जपण्यासाठी काढलेल्या रांगोळीच झुळणाऱ्या पानांचं, फुलणारऱ्या फुलांचं पेलणाऱ्या हातांच दुसऱ्यासाठी हळाळणाऱ्या मनाचं शेजारच्यांच्या दुःखाने आपल्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या माणसांच माणुसकी जपणाऱ्या मनाचं आपुलकीने जवळ घेणाऱ्या हाताच नसावं नुसत्या बातांच आणि पोकळ मनाचं अस समृद्ध गाव असावं माझ.

जगणं न्यार झालं असत........

      आपल्या आयुष्यात कितीही सांभाळून राहायचा प्रयत्न केला ना तरीही काही ना काही घडतच हो ना? आयुष्य एक धाग्याच्या रीळ सारख आहे.नीट गुंडाळला तरीही काही कारणाने धागा त्या रीळपासून वेगळा केलाच जातो.त्याला सुईमध्ये टाकून खाली गाठ लावलीच जाते ना. तो धागा परत त्या रीळ ला गुंडाळता येतो पण परत जोडता येत नाहीच. कितीतरी अनुभव या धाग्यासोबत जोडले जातात .        एकदा मन तुटल्यानंतर सावरायला काय वेदना होतात हे सांगायची गरज नाही. अर्थात ज्याचं तुटलं असेल त्यांना कळेल.पण जर तीच गोष्ट नव्याने झाली आणि दुसऱ्यांदा तुटलेल मन वेदनेच्या पलीकडेच हो ना? प्रत्येक गोष्टीमधला आनंद काही औरच असतो.                  प्रेम एकदाच होत अस म्हणतात .नंतर होणारी केवळ तडजोड. पण मला नाही वाटत.प्रत्येक गोष्टींमध्ये एक वेगळी गंमत असते .आधीच्या अनुभवाच्या जोरावर आयुष्यात येणारी चांगली गोष्ट लाथाडता येत नाही.प्रत्येकच गोष्टीचा अनुभव हा वेगळा असतो.हा फक्त आपल्याला त्यातून योग्य बाबी शिकून पुढे जायचं असत.     ...