मुख्य सामग्रीवर वगळा

स्वतः

 




निस्वार्थीपणे जगत आले आहे
पण इतरांनी अर्थ मात्र सोईनुसार लावले
खोटे वागणे कधी नाही जमले
खोटे खोटे चांगले म्हणावे तरी कसे
स्वतःच्या आनंदासाठी
कुणालाही कधीच फसवले नाही
अन ते कधी जमनारही नाही
चुकांवर पांघरून कधी
देता आले नाही
इतरांना दुःखून आनंदी कधीच झाले नाही
स्वतःचा खरेपणा इतरांच्या
वागण्याला टीचवत गेला
खरेपणातूनच शहाणपणा
असा शिक्का मिळाला
या सर्वांमुळे जर कुणी म्हणत असेल मला
की मला माणस जपता येत नाही
तर याचा सार्थ अभिमान आहे माला.

नम्रता मंदा अनंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रश्न

   चेहऱ्यावरच्या हास्याने मनातले दुःख लपेल का? मनात चाललेला गोंधळ जवळच्यालाही उमगेल का? इतकं सोप असतं का आयुष्य जितकं सरळ आपल्याला दिसत की असतं पुरात वाहून गेलेल्या वाळूसारखं? येईल का परत तेच हास्य सुटेल का तोही गुंता , गुंते मधला विरह, विरहातील घालमेल न घालमेल मधून येणारे अश्रू? अश्रूला फुटेल का बांध?  मनाला सुटेल का पाझर? पाझरमधील तो गंध वाटेल का हवा हवासा? -नम्रता

मन......

इच्छा...

इच्छा....  न संपणारी स्वप्नाची एखादी सुंदर माळ असावी न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी तुझ्यासारखी माणसे असावी आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा एक छोटे जग प्रत्येकाजवळ असावे जगाच्या या गर्दीमध्ये कुणीही एकटे नसावे दाटलेल्या या नभास कधीही बरसता न यावे का असे हे भोग माझ्या नशिबी यावे भिजून पावसात सारे जग पाहिले पण... माझ्या शिंपल्यात दोन थेंबही न यावे -नम्रता