किती वेगळ आहे ,जे आवडत,बघितलेलं असत , त्याचा विचारही होत नाही आणि ज्याला कधी पाहिलेलं नसत,काही माहिती नसत कुणीतरी तिसरी व्यक्ती येऊन सांगते त्यावर विश्वासही बसतो. त्यांच्या सांगण्यावरून वारंवार दाखवायलाही आपले नातेवाईक, घरचे तयार होतात. आपण आयुष्यात कितीही चांगल वागलं ना तरीही काही ना काही राहूनच जात. आपलं वागणं, बोलण, प्रत्येकवेळी सारख असेलच अस नाही ना.
आपली होणारी चिडचिड ही रास्त असते. पण ती समजून घेता आलं असत तर किती बर झालं असत . अस म्हणतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही कायम हसत रहायच. आपले गराने कुणालाही सांगायचे नाही.कमाल आहे ना ,प्रत्येकवेळी नाही हो पुस्तकातल्या शब्दसारखं जगता येत.
वाटत कुणाजवळ तरी बोलावं ,हक्काचे. प्रत्येकच बाब सांगावी
. नेहमीच चांगल्या गोष्टी का शेअर कराव्यातना कधी कधी मनातली प्रत्येकच गोष्ट बोलावी. मी म्हणते बोलावीच याने मन हलक होत की नाही माहीत नाही पण यामुळे नवीन चांगल्या गोष्टींचा विचार मन करायला लागत.
बोलाव सर्वकाही मनसोक्त अगदी सर्वच. चिडचिड करावी आदळ आपट करावी हे सर्व होणे गरजेचे आहे.हे जर नाही केल ना तर एक वेगळीच घुसमट होते.जे की हानीकारक आहे.स्वतःसाठी सोबतच इतरांसाठीही. हल्ली याला मूड स्विंग असे लेबल लावण्यात आल आहे.
का जगतोय आपण पुतळ्यासारख. जितकं सोज्वळ, शांत, समजदार दाखवतो तितकं खरच आहोत का हो? समजदारीच्या गोष्टी ज्या जगासमोर दाखवतो ते घरातही पाळतो का?खरं सांगा?
कधी कधी ना उगाच चिडचिड होते पण ते समजून घेता आल असत ना तर किती भारी झालं असत.कधी कधी उगाचच वाटत मनसोक्त बोलाव. पण हल्ली just ignore अस चाल्लय.उगाचच व्यस्त दाखवायच ट्रेंड आहे ना. जे खरोखर व्यस्त असतात त्यांचा विषय वेगळा हा. कस आहे ना बोलाव,जे असेल ते स्पष्ट. गुंता कमी होतो हो.
आयुष्यात प्रत्येकालाच काम आहे ,प्रत्येकच जण आपापल्या कामात व्यस्त आहे.अगदी कुत्रे मांजरीसुद्धा हल्ली व्यस्त झालेत. पण खर सांगू आज परिस्थिती अशी आहे ना कधी कुणाची विकेट पडेल सांगता येत नाही.
बघा वेळ मिळत असेल तर.......नुसताच विचार करून उपयोग नाही.कस आहे ना आयुष्यातला एक क्षण असा येतो खूप एकट वाटत. बरोबर ना?प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो. याला अनेकांची उत्तरे येतात पॉझिटिव्ह वे ने जगायचं ग,सर्व नीट होत.पॉझिटिव्हच्या नावाखाली प्रयत्न करणे आपण सोडून देतो ,हो ना?
नम्रता अनंत कडव
थोड confused पण प्रत्येकाच्या मनातलं
उत्तर द्याहटवा