मैत्री हक्काची असते तेव्हा आपण किती मनमोकळेपणाने बोलतो ना. अगदी सर्वच. बिनधास्त, पुढे काय होणार याचा जराही विचार करत नाही. खळखळत्या पाण्यासारखी पुढे-पुढे-पुढे सरकत जाते ती मैत्री.
काही गोष्टी पटतात काही नाही. पण शांत समंजस्याने राहून बघाव राहता येत. प्रत्येकचवेळी शांत राहिल्यावर एकदा कधीतरी बान सुटतोच नाही का ? पण तेव्हा खरी गरज ही मैत्री ओळखण्याची असते. प्रत्येकवेळी शांत राहणारी, शांत समजस्यांनी वागणारी राहणारी जर एखादेवेळी अचानक चिडली तर अशावेळी काय प्रतिक्रिया असावी ?क्षणभर राग साहजिकच आहे. पण......पण अंतर्मनात खोलात जाऊन विचार केला. मुळाशी गेलो तर उत्तर नक्की सापडत. अशावेळी अबोला धरणे खरच योग्य आहे का ?
आपण जेव्हा आपल्या माणसांवर कळत नकळतपणे रागावतो ,भांडतो,माफी मागतो पुन्हा जवळ येतो. ज्या व्यक्तीवर आपण हक्क दाखवतो ती व्यक्ती आपल्याला आपल्या जिवापेक्षाही प्रिय असते.
पण खर सांगू का ? कधी कधी आपला राग,इगो इतका मोठा होतो यामध्ये सॉरी म्हणूनही भांडण सोडविण्याचा प्रयत्न करूनही परत मैत्री जशीच्या तशी होऊन एकत्र येण हे सोल्युशन उरतच नाही.
पण कधी असा विचार आला का की, सॉरी म्हणूनही माफ नाही केल आणि ती व्यक्तीच हे जग सोडून गेली तर, मग...? मग कुणासोबत रुसून बसणार आणि किती वेळ?
आयुष्य खूप छोट आहे.खूप बोलायच असत .सांगायच असत. पण बऱ्याच गोष्टी मनातल्या मनातच राहून जाताता आणि उरतो मग एकांत. चिडणे ,भांडण ,राग असायलाच हवा.पण इतकेही नको की क्षणात त्या व्यक्तीला गमावून बसू आणि नंतर रिग्रेट करण्यापलीकडे काहीही उरणार नाही.
कोणावाचून कोणाचेही अडत नाही हे जरी खरे असले तरी काही ना काही प्रमाणात अडतच हो. प्रत्येक नात हे सुंदरच असते. त्याला एक वेगळा अलंकार असतो.प्रत्येक नात्याला मधुर गंध असतो.
द्वेषामुळे ,रागामुळे दुरावा निर्माण करून हक्काची मैत्री का गमवायची ना. हे थोडे बाजूला केले तर मैत्रीच्या पुस्तकातील एक नवीन धडा उघडला जाऊ शकतो. नवीन अलंकारासह, सुगंधासह 'मैत्री हक्काची असते तेव्हा....'
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा