मुख्य सामग्रीवर वगळा

माझ्या कल्पनेतील गाव

 माझ्या कल्पनेतील गाव असावं गावसारखं 

सकाळी पाखरांचा किलबिलाट ऐकवणार
जनावरांच्या गळ्यातील घुंगराच्या
रुणझुण आवाजत रमणार

सकाळच्या शेण्याच्या सड्याने सारवलेल्या अंगणात
संस्कृती जपण्यासाठी काढलेल्या रांगोळीच
झुळणाऱ्या पानांचं, फुलणारऱ्या फुलांचं
पेलणाऱ्या हातांच

दुसऱ्यासाठी हळाळणाऱ्या मनाचं
शेजारच्यांच्या दुःखाने आपल्या डोळ्यात
पाणी आणणाऱ्या माणसांच

माणुसकी जपणाऱ्या मनाचं
आपुलकीने जवळ घेणाऱ्या हाताच
नसावं नुसत्या बातांच आणि पोकळ मनाचं
अस समृद्ध गाव असावं माझ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रश्न

   चेहऱ्यावरच्या हास्याने मनातले दुःख लपेल का? मनात चाललेला गोंधळ जवळच्यालाही उमगेल का? इतकं सोप असतं का आयुष्य जितकं सरळ आपल्याला दिसत की असतं पुरात वाहून गेलेल्या वाळूसारखं? येईल का परत तेच हास्य सुटेल का तोही गुंता , गुंते मधला विरह, विरहातील घालमेल न घालमेल मधून येणारे अश्रू? अश्रूला फुटेल का बांध?  मनाला सुटेल का पाझर? पाझरमधील तो गंध वाटेल का हवा हवासा? -नम्रता

मन......

इच्छा...

इच्छा....  न संपणारी स्वप्नाची एखादी सुंदर माळ असावी न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी तुझ्यासारखी माणसे असावी आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा एक छोटे जग प्रत्येकाजवळ असावे जगाच्या या गर्दीमध्ये कुणीही एकटे नसावे दाटलेल्या या नभास कधीही बरसता न यावे का असे हे भोग माझ्या नशिबी यावे भिजून पावसात सारे जग पाहिले पण... माझ्या शिंपल्यात दोन थेंबही न यावे -नम्रता