मुख्य सामग्रीवर वगळा

जगणं न्यार झालं असत........

    


आपल्या आयुष्यात कितीही सांभाळून राहायचा प्रयत्न केला ना तरीही काही ना काही घडतच हो ना? आयुष्य एक धाग्याच्या रीळ सारख आहे.नीट गुंडाळला तरीही काही कारणाने धागा त्या रीळपासून वेगळा केलाच जातो.त्याला सुईमध्ये टाकून खाली गाठ लावलीच जाते ना. तो धागा परत त्या रीळ ला गुंडाळता येतो पण परत जोडता येत नाहीच. कितीतरी अनुभव या धाग्यासोबत जोडले जातात .

       एकदा मन तुटल्यानंतर सावरायला काय वेदना होतात हे सांगायची गरज नाही. अर्थात ज्याचं तुटलं असेल त्यांना कळेल.पण जर तीच गोष्ट नव्याने झाली आणि दुसऱ्यांदा तुटलेल मन वेदनेच्या पलीकडेच हो ना? प्रत्येक गोष्टीमधला आनंद काही औरच असतो.


                 प्रेम एकदाच होत अस म्हणतात .नंतर होणारी केवळ तडजोड. पण मला नाही वाटत.प्रत्येक गोष्टींमध्ये एक वेगळी गंमत असते .आधीच्या अनुभवाच्या जोरावर आयुष्यात येणारी चांगली गोष्ट लाथाडता येत नाही.प्रत्येकच गोष्टीचा अनुभव हा वेगळा असतो.हा फक्त आपल्याला त्यातून योग्य बाबी शिकून पुढे जायचं असत.
         मनात होणारे वादळ आयुष्यातील काही गोष्टी शेअर करता आल्या असत्या तर किती बर झालं असत ना?
          जगणं काय असत ते छोट्या छोट्या गोष्टींमधून कळत. एकही गोष्ट साम्य नसल्यावर पाहिलेलं स्वप्न वेगळं आणि सर्वकाही साम्य असलेल तुटलेल स्वप्न काही वेगळच . कुठेतरी आशेचा किरण होता.एक वेगळी उमेद होती.गोष्टी जुळत आहे हे स्पष्ट दिसत होतं. जुळल्यादेखील पण कस आहे ना पाखरू जन्माला येत अन पंखात बळ आलं की भुर्रकन उडून जात. तस काहीसं झालंय. एक मात्र कळलं प्रत्येकच गोष्ट बोलून दाखवायची नसते. आपण ठरवलेली प्रत्येकच बाब पूर्ण होईलच अस नाही ना. जगण्यासाठी स्वतःच्या मनावर ताबा हवा.मग जगण्यातली गम्मत रंगत जाते. ठरवलेली प्रत्येकच गोष्ट घडेल अस नाही पण ठरलेलं मात्र नक्की घडत. म्हणून कदाचित याला आयुष्य म्हणत.
    

    अस म्हणतात प्रेम एका नजरेत होत.एका भेटीत होत. खरच का हो? मग इथे वारंवार भेतूनही का कळू नये. आणि कळल्या तरी कदाचित दाखवल्या जात नाही. जस जस वय वाढत तस समजदारपणा जास्त येतो ना. कदाचित म्हणून असेल.

             धाग्याचा मधला माधातला कुठलाही धागा तोडला ना तर संपूर्ण रीळ खराब होतो. बरोबर ना? तस काहीसं झाल्यासारखं वाटत ,असो.
           "काही गोष्टी बंद गळ्यामध्येच असलेल्या बऱ्या असतात.वाटलं होतं जगत येईल.स्वछंदपणे उडता येईल.'मनसोक्त बेधुंद जीवनाचा आनंद घेता येईल.आयुष्यात आलेला प्रत्येक सजीव निर्जीव जगतो पण मला जगायचं होत. कमळाच्या फुलासारखा अगदी चिखलातून वर येऊन वाऱ्याच्या तालावर आकाशाकडे ताठ मानेने मनसोक्त बघायचं होत,'पण असो. ती प्रत्येकच गोष्ट करायची होती जी राहून गेली. आपल्याला वाटत तेवढं सोपं नसत ना आयुष्य. प्रत्येक वळणावर बदल असतात."


           काही गोष्टींचा नाईलाजाने स्वीकार करावाच लागतो आणि कदाचित तेच योग्य असत सर्वांसाठी. हा ज्याचा विचारही केला नव्हता ते मात्र घडून गेलं कळत नकळत. आपल्या आयुष्यातल्या जगण्यात किती गंमती जमती आहेत ना . फक्त आपल्याला त्या ओळखता यायला हव्या.सूर्य, चंद्र उगवायचे कधीच थांबत नाही. दिवसामागून दिवस पलटायचे कधीच थांबत नाही. आयुष्यात खुप वेगवेगळी वळणे असतात. प्रत्येक वळणावर आपल वागणं योग्यच राहील अस नसत.
       आयुष्य जगायचं असेल ना तर गोष्टींचा स्वीकार करावा लागतो.मान्य करावं लागतं स्वतःला पटेल तोवर पटवून द्यावं लागतं तेव्हाच आयुष्यतला सुगंध कायम राहतो.अवघड आहे पण ठरवलं न तर अशक्य काहीच नाही पण एक सांगू सोबत मिळाली असती ना तर जगणं न्यार झालं असत हे मात्र नक्की.
          नम्रता अनंत कडव

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपुर्ण

                                                          असाही एक दिवस उगवेल असं कधी वाटलंच  नाही, मी माझं माझं करत राहिली अन माझं कधी निसटून गेलं समजलंच नाही...     अचानक मला काल रात्री कॉल आला आणि तो म्हणाला मला कोणत्याही परिस्थितीत मध्ये दोन महिन्याच्या आत लग्न करायचंय.! मला समजेच ना की, हा अचानक असा का बोलतोय..? मला वाटलं नेहमीसरखी आजही प्रेमाने चेष्टा करत असेल. मी दुर्लक्ष करत विषय सोडून दिला.   आज पहिला पेपर असल्याने सकाळी उठून, पटापट आवरून पेपरला गेले, पेपर सुटल्यावर मोबाइल बघितला तर त्याचे 6 मिस कॉल होते , मी घाबरले कि असं काय झाल कि एकदम 6- 6 मिस कॉल्स? कॉलबॅक केला तर लगेच उचलला फोन त्याने आणि तो परत तेच बोलला कि, मला तुझ्यासोबत दोन माहिन्यात लग्न करायचं.! आता मात्र मला त्याच्या आवाजात गांभीर्य जाणवलं, मी थोडी खोलात जाऊन विचारलं नेमकं काय झालंय? तू असं लग्न करायचं आणि तेही दोन महिन्यात हे , एकदम मना...

माझ्या कल्पनेतील गाव

  माझ्या कल्पनेतील गाव असावं गावसारखं  सकाळी पाखरांचा किलबिलाट ऐकवणार जनावरांच्या गळ्यातील घुंगराच्या रुणझुण आवाजत रमणार सकाळच्या शेण्याच्या सड्याने सारवलेल्या अंगणात संस्कृती जपण्यासाठी काढलेल्या रांगोळीच झुळणाऱ्या पानांचं, फुलणारऱ्या फुलांचं पेलणाऱ्या हातांच दुसऱ्यासाठी हळाळणाऱ्या मनाचं शेजारच्यांच्या दुःखाने आपल्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या माणसांच माणुसकी जपणाऱ्या मनाचं आपुलकीने जवळ घेणाऱ्या हाताच नसावं नुसत्या बातांच आणि पोकळ मनाचं अस समृद्ध गाव असावं माझ.

ती.....

 ती.. घरात एकटं असल्यावर तुझ्यासोबत जगता येत... थोडं हसून झाल्यावर मनसोक्त रडता येत.. आपल्या रोजच्या भेटी तशा नवीनच असायच्या  ... क्षणभर भेटलो तरीही हृदय जाळीत बसायच्या... कधी कधी आपली भेट तेव्हढ्यापुरतीच असायची तेव्हा थोडस रुसूनही तू गोड हसायची.... तुझ्या प्रेमाची विशालता बोलते अबोल गाणी तुझ्या विरहाची वेदना आणते डोळ्यात पाणी....                       नम्रता अनंत कडव