असाही एक दिवस उगवेल असं कधी वाटलंच नाही, मी माझं माझं करत राहिली अन माझं कधी निसटून गेलं समजलंच नाही... अचानक मला काल रात्री कॉल आला आणि तो म्हणाला मला कोणत्याही परिस्थितीत मध्ये दोन महिन्याच्या आत लग्न करायचंय.! मला समजेच ना की, हा अचानक असा का बोलतोय..? मला वाटलं नेहमीसरखी आजही प्रेमाने चेष्टा करत असेल. मी दुर्लक्ष करत विषय सोडून दिला. आज पहिला पेपर असल्याने सकाळी उठून, पटापट आवरून पेपरला गेले, पेपर सुटल्यावर मोबाइल बघितला तर त्याचे 6 मिस कॉल होते , मी घाबरले कि असं काय झाल कि एकदम 6- 6 मिस कॉल्स? कॉलबॅक केला तर लगेच उचलला फोन त्याने आणि तो परत तेच बोलला कि, मला तुझ्यासोबत दोन माहिन्यात लग्न करायचं.! आता मात्र मला त्याच्या आवाजात गांभीर्य जाणवलं, मी थोडी खोलात जाऊन विचारलं नेमकं काय झालंय? तू असं लग्न करायचं आणि तेही दोन महिन्यात हे , एकदम मना...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा