आपल्या आयुष्यात कितीही सांभाळून राहायचा प्रयत्न केला ना तरीही काही ना काही घडतच हो ना? आयुष्य एक धाग्याच्या रीळ सारख आहे.नीट गुंडाळला तरीही काही कारणाने धागा त्या रीळपासून वेगळा केलाच जातो.त्याला सुईमध्ये टाकून खाली गाठ लावलीच जाते ना. तो धागा परत त्या रीळ ला गुंडाळता येतो पण परत जोडता येत नाहीच. कितीतरी अनुभव या धाग्यासोबत जोडले जातात . एकदा मन तुटल्यानंतर सावरायला काय वेदना होतात हे सांगायची गरज नाही. अर्थात ज्याचं तुटलं असेल त्यांना कळेल.पण जर तीच गोष्ट नव्याने झाली आणि दुसऱ्यांदा तुटलेल मन वेदनेच्या पलीकडेच हो ना? प्रत्येक गोष्टीमधला आनंद काही औरच असतो. प्रेम एकदाच होत अस म्हणतात .नंतर होणारी केवळ तडजोड. पण मला नाही वाटत.प्रत्येक गोष्टींमध्ये एक वेगळी गंमत असते .आधीच्या अनुभवाच्या जोरावर आयुष्यात येणारी चांगली गोष्ट लाथाडता येत नाही.प्रत्येकच गोष्टीचा अनुभव हा वेगळा असतो.हा फक्त आपल्याला त्यातून योग्य बाबी शिकून पुढे जायचं असत. ...