मुख्य सामग्रीवर वगळा

भेट

 भेट    

मन तुला भेटण्यासाठी
खूपच  धडपडत होते

भेटल्यानंतर मात्र

काही शब्दच सुचत नव्हते

शब्दांची 
जुळवाजुळव
मनात करून 
तुझ्याशी बोलत होते

मनाची स्थिती कावरी
बावरी का झाली हे
स्वतःला विचारत होते

उत्तर समोर असूनही
वेड मन स्वतःच्या शोधात होते

भेटीतले क्षण मनात जपले
पण मनातील काहूर सारखे
का उठत होते?

सख्या तुझं वागणं सगळकाही न कळल्यासारखे
खरच का तुझेही मन माझ्यासाठी झुरत होते?

                                         नम्रता अनंत कडव

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रश्न

   चेहऱ्यावरच्या हास्याने मनातले दुःख लपेल का? मनात चाललेला गोंधळ जवळच्यालाही उमगेल का? इतकं सोप असतं का आयुष्य जितकं सरळ आपल्याला दिसत की असतं पुरात वाहून गेलेल्या वाळूसारखं? येईल का परत तेच हास्य सुटेल का तोही गुंता , गुंते मधला विरह, विरहातील घालमेल न घालमेल मधून येणारे अश्रू? अश्रूला फुटेल का बांध?  मनाला सुटेल का पाझर? पाझरमधील तो गंध वाटेल का हवा हवासा? -नम्रता

मन......

ती.....

 ती.. घरात एकटं असल्यावर तुझ्यासोबत जगता येत... थोडं हसून झाल्यावर मनसोक्त रडता येत.. आपल्या रोजच्या भेटी तशा नवीनच असायच्या  ... क्षणभर भेटलो तरीही हृदय जाळीत बसायच्या... कधी कधी आपली भेट तेव्हढ्यापुरतीच असायची तेव्हा थोडस रुसूनही तू गोड हसायची.... तुझ्या प्रेमाची विशालता बोलते अबोल गाणी तुझ्या विरहाची वेदना आणते डोळ्यात पाणी....                       नम्रता अनंत कडव