आज जागतिक मातृदिन.जवळपास सर्वांनीच जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा असे व्हाट्सअप्प सटेट्स, इन्स्टग्राम ट्विटर ला स्टोरी किंवा पोस्ट टाकल्याचना अर्थात टाकणारच. कारण सध्या ट्रेन्ड आहे.हो ना?काय धावतोय आपण ट्रेन्डच्या मागे ,मस्त. Love you mamma, love you Aai , हा प्रेम नाही असं माझं बिलकुल म्हणणे नाही. प्रत्येकाच्या मनात आईविषयी प्रेम आदर सर्वकाही असतच. मला इतकच म्हणायचय इतरांना दाखवण्यासाठी हे करू नका. आपली आई खूप साधी आहे हो.अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिला आनंद मिळतो. आपल्या जेवणात. आपल्याला वेळेत सर्व करून देण्यात. आपण घरी लवकर येण्याची आशा अनेक गोष्टींमध्ये. तुम्हालाही माहीती आहे.तिला आपल्याला गरम गरम करून खाऊ घालायला खूप आवडतं पण कधी आपण तिच्या स्वयंपाकाची स्तुती केली आहे काहो?की आई आज खूप छान भाजी झाली ग. मस्त झाली आहे (जरी झाली नसेल तरीही ). ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना तो आईच जगणं भारी करून टाकत. तिला मिळणार समाधान यातून दिसत .
अलीकडे मार्च 2020 पासून सर्वजण घरात एकत्र राहत आहोत. कस वाटतय आपल्याला ? किती काम निघत घरात डोळ्यादेखत दिसतंय सर्वांना .त्यात कामवाली बंद. आपल्या वाट्याला एकजरी जास्त काम आलं तरी आपली कसली चिडचिड होते ना? विचार करा आईवर किती ताण आलेला असेल . विचार काय आता तर कृती करायची वेळ आली आहे . जे म्हणायचे ना "दिवसभर तुला काय काम असत ग घरीच तर असते." त्यांनी उघड्याडोळ्यांनी दिनक्रम पाहिला आहे तरीही या वाक्यात जर बदल होत नसेल तर आज आपल्याला पुन्हा संस्काराचे धडे घेण्याची गरज आहे.
तिलाही तयार व्हावस वाटतं पण कामाच्या गडबडीत तर कधी काही वेगळ्या कारणाने तयार होऊ शकत नाही पण तरीही तुम्ही कधी तिची स्तुती केली आहे का हो? 'आई मस्त दिसत आहेस ग' . अस म्हटल्यावर ती लगेच सारवते ,साडीच्या मिऱ्या नीट करेल ,पदर नीट करेल लगेच हळूच लाजून केस सावरेल आणि या सर्वांमध्ये तिचा चेहरा जो मोगऱ्याच्या फुलासारखा फुलून येतो ना वा क्या बात. या वागण्यातून मिळत काहीच नाही हो पण ती जशी आहे ना तशी तिला स्वतःला नव्याने आवडायला लागते.
रोजच्या कामातून तिलाही कंटाळा येतोच ना . कधी आपण घर झाडून ,भांडे घासून ,देवपूजा करून ,चहा बनवून इतकच नाही तर स्वतःचे काम स्वतः करून तिचा भार हलका केल्याचं आठवतय का?
दिवसातून एकदातरी विचारा आईला 'खूप काम होतय का ग?' ती कण्हत असेल तर काही दुखतय का ग? कधीतरी तिला आवडणारे पदार्थ करून बघा. गम्मत आहे हो या सर्वांमध्ये. जे की मागे पडतय अस दिसत आहे . आपण नेहमी बाबांचीच बाजू घेतो कधीतरी आईची घेऊन बघा. आपल्यामुळे तिला मिळणारी हिम्मत ही जगातील सर्वाधिक वाटत . उगाच काय लोकांनी आईविषयी एवढं सगळं लिहून ठेवल आहे . प्रत्येक गोष्टींमध्ये बाबाईतकच तिलाही महत्व देऊन बघा . समजत जरी नसेल ना तरी सांगून बघा. ती आपली आई आहे आणि आपण तिचे लेकरं हे नातदेखील बाप वाटेल.
कस आहे ना आईचे महत्व हे पुस्तकांमधून वाचतो,TV चित्रपटांमध्ये बघतो , भाषणांमध्ये मोठे मोठे गुणगाण ऐकतो, कवितांमध्ये दिसत. श्रवण, भाषण ,वाचन,लेखन, या सर्वांमध्ये आईचे महात्म्य दिसत. फक्त कृतीतून मात्र याच्या तुलनेत नाहीच्या बरोबर . "मी फार प्रॅक्टिकल वागणारा माणूस आहे" अस बोलणाऱ्यांच्या वागण्यात हे कुठेतरी राहून जात आहे असं दिसत आहे.
घरामध्ये आपली काही मदत होते का हो काका,दादा,ताई?
आणखी एक,तिच्या माहेरच्यांना वाईट बोलणे जरा बंद होतील का हो? आपल्या परिवारातील कसे आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि तिलाही उत्तमरीत्या कारण ही वेळ आपल्यावरही येऊ शकते. एवढ जमतंय का बघा जरा.
प्रत्येक दिवस का मातृदिन आहे
प्रत्येक दिवस हा नवीन शक्तीचा पर्व आहे
प्रत्येक दिवस हा उत्सव आहे मानूसकीचा
ज्याची केंद्रबिंदू आई आहे
'तू आहेस म्हणून तर जमत आहे ग सगळं ' अस म्हणून तर बघा . मातापित्याने मिळून आपल्याला जन्मदिला आहे .त्यामुळे जे पित्यासाठी तेच मातेसाठी आणि जे मातेसाठी तेच पित्यासाठी . ज्या दिवशी यातील काहीअंशी जरी साध्य होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आईचा आदर होईल. मातृदिन साजरा होईल. सहज आहे पण विचार करून कृतीत आनुया.धन्यवाद! तुम्हा सर्वांना
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
नम्रता अनंत कडव
खुप मस्त लिहिले नम्रता
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙂
हटवाWa khup mast lihilay .vastavik v maulik margdarshan👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाThank you 🙂
हटवा