मुख्य सामग्रीवर वगळा

हे सांगायचे आहे तुला


     जरा ऐकना ...

काही सांगायचे आहे तुला 

तुला भेटतांना होणारी हृदयाची धडपड

ऐकवायची आहे तुला

तुला पाहतांना हळूच झुकणारी माझी नजर 

दाखवायची आहे तुला

तुझ्याबरोबर चालतांना हा रस्ता कधी संपू नये

हे सांगायचे आहे तुला

तू सोबत असतांना सूर्याची किरणेदेखील गार वाटतात 

हे सांगायचे आहे तुला 

तुझाच चेहरा नजरेसमोर असतो 

हे सांगायचे आहे तुला

तुझ्याबरोबर बोलतांना शब्दांची होणारी धडपड

ऐकवायची आहे तुला

तुझ्याशिवाय एक क्षणही जात नाही 

हे सांगायचे आहे तुला 

तुझ्याबद्दल माझ्या मनातल्या भावना 

सांगायच्या आहे तुला 

जरा ऐक ना 

काही सांगायचे आहे तुला 



नम्रता अनंत कडव



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रश्न

   चेहऱ्यावरच्या हास्याने मनातले दुःख लपेल का? मनात चाललेला गोंधळ जवळच्यालाही उमगेल का? इतकं सोप असतं का आयुष्य जितकं सरळ आपल्याला दिसत की असतं पुरात वाहून गेलेल्या वाळूसारखं? येईल का परत तेच हास्य सुटेल का तोही गुंता , गुंते मधला विरह, विरहातील घालमेल न घालमेल मधून येणारे अश्रू? अश्रूला फुटेल का बांध?  मनाला सुटेल का पाझर? पाझरमधील तो गंध वाटेल का हवा हवासा? -नम्रता

मन......

इच्छा...

इच्छा....  न संपणारी स्वप्नाची एखादी सुंदर माळ असावी न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी तुझ्यासारखी माणसे असावी आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा एक छोटे जग प्रत्येकाजवळ असावे जगाच्या या गर्दीमध्ये कुणीही एकटे नसावे दाटलेल्या या नभास कधीही बरसता न यावे का असे हे भोग माझ्या नशिबी यावे भिजून पावसात सारे जग पाहिले पण... माझ्या शिंपल्यात दोन थेंबही न यावे -नम्रता