मुख्य सामग्रीवर वगळा

प्रेम


 ही कविता आहे 

इतकाच भाव मनात ठेव

माझ्यात आता ताकत नाही 

कुणाला दुखवायची हे ध्यानात ठेव 


समज गैरसमज नको परत काहीच 

माझं प्रेम तुझं प्रेम

माझ्या भावना तुझं दुःख

रुसवे फुगवे नाही आता परवडणारे 


खूप घालमेल झाली

जीव कासावीस होऊन गेला

काय सांगू सख्या तुला

माझा जीव माझ्यातच नाही राहिला 


परत तुझ्याशी बोलणं

नव्याने गोष्ट 

सुरू करणे

आता नाही जमायचे

हे घाव मनावरचे आता नाही परवडायचे 


दुखलं असेल तुझही मन

कितीदा सावरायचे

तुझ्या या वागण्यातले

अदलाबदल आता नाही जमायचे 


किती सावरू तुला अन मलाही

नाही घेणार कुणी समजून

प्रेम वेदना तुझ्या आणि माझ्या 

आता दोघांनीच जगाशी लढायचे


                  नम्रता अनंत कडव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रश्न

   चेहऱ्यावरच्या हास्याने मनातले दुःख लपेल का? मनात चाललेला गोंधळ जवळच्यालाही उमगेल का? इतकं सोप असतं का आयुष्य जितकं सरळ आपल्याला दिसत की असतं पुरात वाहून गेलेल्या वाळूसारखं? येईल का परत तेच हास्य सुटेल का तोही गुंता , गुंते मधला विरह, विरहातील घालमेल न घालमेल मधून येणारे अश्रू? अश्रूला फुटेल का बांध?  मनाला सुटेल का पाझर? पाझरमधील तो गंध वाटेल का हवा हवासा? -नम्रता

मन......

इच्छा...

इच्छा....  न संपणारी स्वप्नाची एखादी सुंदर माळ असावी न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी तुझ्यासारखी माणसे असावी आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा एक छोटे जग प्रत्येकाजवळ असावे जगाच्या या गर्दीमध्ये कुणीही एकटे नसावे दाटलेल्या या नभास कधीही बरसता न यावे का असे हे भोग माझ्या नशिबी यावे भिजून पावसात सारे जग पाहिले पण... माझ्या शिंपल्यात दोन थेंबही न यावे -नम्रता