जन्म झाल्यापासून प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडतच , कुणाच्या आयुष्यात चांगल तर कुणाच्या वाईट.अर्थात ते प्रत्येकाच्या मनस्थितीवर अवलंबून राहत, मनासारख घडल तर चांगल आणि मनाविरुद्ध घडल तर वाईट नाही का ,असो, तर मुद्दा असा की जन्माला आलेल्या व्यक्तीचे मरण लिखित असतच हा स्वरूप मात्र वेगळ असू शकत, अलीकडच्या काळात जरा याचे प्रमाण वाढलेच ना , बाहेरची गोष्ट जाऊद्या हो घरातीलच बघा ना . आई च मरण कामामुळे कारण तिच्यावर जरा जास्तच भर होतोय त्यामुळे तिची होणारी चिडचिड मग काय यात खास मरण बाबाच कारण राग त्यांच्यावरच निघणार ना नंतर बाबा काय करतात त्यांच्या चिडचिडचा घरच्या वातावरणावर जास्त परिणाम होतो मग यात मरण होत ते मुलांचं, हे तर झालं मोठे मूल असण्याच्या घरात कारणं इथे शब्दांचा मार होतो हाथ नाही न उचलू शकत.
छोटे मुले ज्याघरात आहे इथे आहे खरी गंमत ,कारण इथे मरण लहान मुलांच , घरातील चिडचिड ही धपाधप मुलांच्या पाठीवर पडते. लहान मुले रडून मोकळे होतात. मोठ्यांच तस नसतं ना त्यांना राडताही येत नाही . मग काय आतल्या आत नुसतीच घुसमट. प्रत्येकाचीच होते हो लहान काय नि मोठे काय बरोबर ना ?
मरण म्हणजे नक्की काय? अंगातला प्राण संपणे म्हणजे मरण? की शांत एकही अवयव न हलवता अंथरुणावर पडलेला म्हणजे मरण? की शवअवस्थेच्या वेळी शांत झोपलेला व्यक्ती पांढरे अंथरून शेजारी बायको अथवा नवरा सुन्न होऊन एकटक पाहणारे , जिवाच्या आकांताने अगदी बेबीच्या देठापासून रडत असलेली मुगली , त्याच क्षणी स्वतःच दुःख सावरून परिस्थितीला सांभाळणारा मुलगा ही परिस्थिती म्हणजे मरण? मग
मरण म्हणजे नक्की काय ?
जिवंत असूनही त्यांना समजून न घेणं हे खऱ्या अर्थाने मरण आहे , कितीतरी वेळा आपले मित्रा परिवारातील , नातेवाईक , बाहेरील क्षणिक भेटलेली व्यक्ती कित्येकदा आपल्याला काळजीत , टेंशनमध्ये दिसतात पण बहुदा आपण नसत्या भानगडी नको म्हणून सोडून देतो कित्येकदा तेच तेच रडगाणं समजून दुर्लक्ष करतो .पण हे खरंच बरोबर आहे का ? मान्य आहे जीवन आहे सुख दुःख येणारच पण प्रत्येकाची वेळ असते ती वेळ निभावून नेण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची निश्चितच गरज असतेच . जर एकमेकांच्या आधाराची गरज नसती ना तर देवाने एकेरी दुनिया घडवली असती. त्यामुळे माणसं जपा , जपणे म्हणजे चुकांवर पांघरून घालणे नव्हे तर एकमेकांना समजून घ्या , खऱ्या खोट्याची जाणीव करून दया .परिस्थिती स्वीकारायला शिका .सध्याच्या परिस्थितीत सल्याची नाही सोबतीची गरज आहे . अस केल्यास एखाद्या जिवंत माणसाला मनाने मरण्यापासून आपल्याला नक्कीच वाचवण्यात यश येईल.
नम्रता अनंत कडव
एकदम मार्मिक शब्दा खर मरण स्पष्ट केल.....
उत्तर द्याहटवामरण म्हणजे काय आहे ,
उत्तर द्याहटवाहे स्पष्ट पणे मांडले .��������������
जिवंत असूनही त्यांना समजून न घेणं हे खऱ्या अर्थाने मरण आहे
हटवाहे सिद्ध केलं........👍👍👍
मी वाचन केले. फार सुंदर विश्लेषण केले. शत प्रतिशत हृदयस्पर्शी लेखन. खुप खुप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाAgdi sampark v yathayogya vivechan,
उत्तर द्याहटवाAgdi samarpak v yathayogya vivechan.khup chhan
उत्तर द्याहटवाAti sundar maranachi sankalpana mandali , kayamch maranani tr apn kayamch sutato pn tu jya maranchi sankalpana mandali te maranane ayushbhar jiv tyat adkun rahato
उत्तर द्याहटवाअतिशय समर्पक वर्णन👌👌
उत्तर द्याहटवाNice 👍
उत्तर द्याहटवातुम्ही तर मरण ह्या शब्दालाच जिवंत केलत.. अप्रतिम...
उत्तर द्याहटवा