मुख्य सामग्रीवर वगळा

तू नसतांना...

तुझे मुके शब्द
मन कोरून गेले
तुझे बोलके डोळे
सारे बोलून गेले

तुझं नाव नेहमीच असतं
माझ्या वेड्या मनावर
तरी का हा जीव होतो
तुला भेटण्यास अनावर

तू  जवळ  असल्याचे
जेव्हा जेव्हा भास व्हायचे
तुझं हसणं, तुझं रुसणं
तेव्हा तेव्हा त्रास देतात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रश्न

   चेहऱ्यावरच्या हास्याने मनातले दुःख लपेल का? मनात चाललेला गोंधळ जवळच्यालाही उमगेल का? इतकं सोप असतं का आयुष्य जितकं सरळ आपल्याला दिसत की असतं पुरात वाहून गेलेल्या वाळूसारखं? येईल का परत तेच हास्य सुटेल का तोही गुंता , गुंते मधला विरह, विरहातील घालमेल न घालमेल मधून येणारे अश्रू? अश्रूला फुटेल का बांध?  मनाला सुटेल का पाझर? पाझरमधील तो गंध वाटेल का हवा हवासा? -नम्रता

मन......

इच्छा...

इच्छा....  न संपणारी स्वप्नाची एखादी सुंदर माळ असावी न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी तुझ्यासारखी माणसे असावी आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा एक छोटे जग प्रत्येकाजवळ असावे जगाच्या या गर्दीमध्ये कुणीही एकटे नसावे दाटलेल्या या नभास कधीही बरसता न यावे का असे हे भोग माझ्या नशिबी यावे भिजून पावसात सारे जग पाहिले पण... माझ्या शिंपल्यात दोन थेंबही न यावे -नम्रता