मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा क्षणभर मिटून डोळे स्वप्न व्हावे पुन्हा एकदा हरवलेल्या वाटांना शोधीत जावे पुन्हा एकदा श्वासात गाणे गुंफीत जावे पुन्हा एकदा आभाळ ओले  मिठीत घ्यावे पुन्हा एकदा तुटलेल्या धाग्यांना  जोडीत जावे  पुन्हा एकदा सुकलेल्या फांदीला  बहर यावे पुन्हा एकदा मनाने एकमेकांच्या सोबत राहावे पुन्हा एकदा....... नम्रता अनंत कडव

भावना

ही कविता आहे  इतकाच भाव मनात ठेव माझ्यात आता ताकत नाही कुणाला दुखवायची हे ध्यानात ठेव समज गैरसमज नको परत काहीच माझं प्रेम तुझं प्रेम माझ्या भावना तुझं दुःख रुसवे फुगवे नाही आता परवडणारे खूप घालमेल झाली जीव कासावीस होऊन गेला काय सांगू सख्या तुला माझा जीव माझ्यातच नाही राहिला परत तुझ्याशी बोलणं नव्याने गोष्ट सुरू करणे आता नाही जमायचे हे घाव मनावरचे आता नाही परवडायचे दुखलं असेल तुझही मन कितीदा सावरायचे तुझ्या या वागण्यातले अदलाबदल आता नाही जमायचे किती सावरू तुला अन मलाही नाही घेणार कुणी समजून प्रेम वेदना तुझ्या आणि माझ्या आता दोघांनीच जगाशी लढायचे नम्रता अनंत कडव

माझ्या कल्पनेतील गाव

  माझ्या कल्पनेतील गाव असावं गावसारखं  सकाळी पाखरांचा किलबिलाट ऐकवणार जनावरांच्या गळ्यातील घुंगराच्या रुणझुण आवाजत रमणार सकाळच्या शेण्याच्या सड्याने सारवलेल्या अंगणात संस्कृती जपण्यासाठी काढलेल्या रांगोळीच झुळणाऱ्या पानांचं, फुलणारऱ्या फुलांचं पेलणाऱ्या हातांच दुसऱ्यासाठी हळाळणाऱ्या मनाचं शेजारच्यांच्या दुःखाने आपल्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या माणसांच माणुसकी जपणाऱ्या मनाचं आपुलकीने जवळ घेणाऱ्या हाताच नसावं नुसत्या बातांच आणि पोकळ मनाचं अस समृद्ध गाव असावं माझ.