मैत्री हक्काची असते तेव्हा आपण किती मनमोकळेपणाने बोलतो ना. अगदी सर्वच. बिनधास्त, पुढे काय होणार याचा जराही विचार करत नाही. खळखळत्या पाण्यासारखी पुढे-पुढे-पुढे सरकत जाते ती मैत्री. काही गोष्टी पटतात काही नाही. पण शांत समंजस्याने राहून बघाव राहता येत. प्रत्येकचवेळी शांत राहिल्यावर एकदा कधीतरी बान सुटतोच नाही का ? पण तेव्हा खरी गरज ही मैत्री ओळखण्याची असते. प्रत्येकवेळी शांत राहणारी, शांत समजस्यांनी वागणारी राहणारी जर एखादेवेळी अचानक चिडली तर अशावेळी काय प्रतिक्रिया असावी ? क्षणभर राग साहजिकच आहे. पण......पण अंतर्मनात खोलात जाऊन विचार केला. मुळाशी गेलो तर उत्तर नक्की सापडत. अशावेळी अबोला धरणे खरच योग्य आहे का ? आपण जेव्हा आपल्या माणसांवर कळत नकळतपणे रागावतो ,भांडतो,माफी मागतो पुन्हा जवळ येतो. ज्या व्यक्तीवर आपण हक्क दाखवतो ती व्यक्ती आपल्याला आपल्या जिवापेक्षाही प्रिय असते. ...